Gallery 2017-10-31T03:25:35+00:00

                                                                                     Gallery

दिनाक : १५ डिसेंबर २०१६
वार :गुरुवार
ठिकाण :मराठी मुलांची शाळा बहाळ

मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ व रोटरी मिलेनियम आयोजित शिबीरा मध्ये बहाळ येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ व रोटरी मिलेनियम तर्फे करण्यात आले होते .शिबिराचे अध्यक्ष स्थानी बहाळ येथील उपसरपंच राजेंद्र महाजन यांनी भूषविले.

शिबिराचे उद्घाटन बहाळ येथील माजी मुख्याध्यापक आबासो. बी.जी.पगारे हे होते. शिबिरामध्ये १०१ रुग्णाची मशिनद्वारे मोतिबिंदू तपासणी करण्यात आली .
तपासणी दरम्यान ३३ रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉ.प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

Read more

Date: 20 Dec., 2016
Venue: आबानंदगिरी चैरिटेबल ट्रस्ट मौजे.कापसेवाडी पो.सरताले ता.जावळी जि.सातारा

अनाथ आश्रमला कापसेवाड़ी येथे भेट Date 20 Dec 2016 Day :- रविवार सामाजिक बांधिलकी…….. मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत महंत आबानंदगिरी चैरिटेबल ट्रस्ट मौजे.कापसेवाडी पो.सरताले ता.जावळी जि.सातारा येथील अनाथ आश्रमातील गरिब व होतकरु मुलांना लागणाऱ्या दैनंदिन गरजू साहित्य मेडलाईफ फाऊंडेशन,बहाळ यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.

Read more
वार: गुरुवार 
ठिकाण : गेट वे ऑफ इंडिया ,मारीन डॉइव्ह ,बहाळ येथील मराठी शाळा, गुढे येथील आश्रम शाळा….

मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवाभावी संस्थेच्या सर्व तरुण युवकांनी हैपेटाइटिस या आजारावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या बद्दल जनजागृती केली.हैपेटाइटिस हा (Viral)अतिशय भयंकर असा रोग आहे या आजाराला हिंदी मध्ये पिलिया असे म्हंटले जाते हैपेटाइटिस हा आजार ५ प्रकारचा आहे त्यात हैपेटाइटिस A ,हैपेटाइटिस B ,हैपेटाइटिस C ,हैपेटाइटिस D,हैपेटाइटिस E,हैपेटाइटिस G या सर्वामध्ये हैपेटाइटिस B हा सर्वात खतरनाक आहे .हा यकृत (LIVER) मध्ये जाऊन मृत्यू पावण्याची पण शंका जास्त असते आणि  हैपेटाइटिस A,B & C हा जास्त प्रमाणात अढळतो .

Read more

दिनाक; ०६ जानेवारी २०१७
वार:शुक्रवार
ठिकाण :सरकारी दवाखाना बहाळ

मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ व् जि.प.आरोग्य आयुर्वेदिक दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह (डायबिटीस) तपासणी व् निदान शिबीरा आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरा दरम्यान *297 रुग्णाची तपासणी* करण्यात आली.तपासणी दरम्यान रुग्णाचे वजन,रक्तदाब,व् रक्तातिल साखरेचे प्रमाण तपासण्यात आले.
तपासणी दरम्यान ज्या रुग्णामधे साखरेचे प्रमाण अधिक आहे अश्या रुग्णाना मोफत औषधे देण्यात आली.

Read more

दिनांक : 8 जानेवारी २०१७,
वार : रविवारी

परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्ट, (एम.आय.डी.सी., टेकनोवा कंपनी समोर, पो. कोयनावेळे, ता. पनवेल) हे सन १९८७ साली निराधार व आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असलेल्या वयोवृद्धांकरिता आधार म्हणून या वृद्धाश्रमाची स्थापना खोपोलीच्या श्री गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सदर वृद्धाश्रमाची पायाभरणी केली या ठिकाणी मेडलाईफ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी दिनांक : 8 जानेवारी २०१७ ,वार : रविवारी या दिवशी भेट दिली.

Read more

बहाळ येथे मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे 25 गरोदर मातांची आरोग्य तपासणी

दिनांक : 8 जानेवारी २०१७,
वार : रविवारी

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत बहाळ येथिल जि.प.आयुर्वेदीक दवाखाना व मेडलाईफ फाऊंडेशन-बहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी गरोदर मातांचे वजन,रक्तदाब,हिमोग्लोबीन, अल्बुमिन शुगर व मधुमेह इ.तपासणी करण्यात आली. नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी गरोदर मातांसाठी *6000* रु. मदत देण्याचे जाहीर केले , ह्या योजनेचा लाभ आपल्या गावातील प्रत्येक गरोदर मातांना मिळावा या योजनेपासुन कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रत्येक गरोदर मातांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे त्याविषयी जनजागृती म्हणुन बचत खाते उघडण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Read more

दिनांक : 12 जानेवारी २०१७,
ठिकाण: मंत्रालय, मरीन ड्राइव मुंबई परिसर

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन ने केली भीम एप्लीकेशन बद्दल जनजागृती मोहिम….
 
वर्षी प्रमाने 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती व् राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ तर्फे मंत्रालय,
मरीन ड्राइव मुंबई परिसर या ठिकाणी भारत सरकारच्या डिजिटल पेमेंट (भीम एप्लीकेशन) बद्दल मेडलाईफ फाउंडेशन च्या सर्व पदाधिकार्यांनी जनजागृती करुण मोहिमेस पाठिंबा देऊन लोकांपर्यंत भीम हे एप्लीकेशन कसे वापरायाचे याबद्दल जास्तीत जास्त लोकानां माहिती दिली.
Read more

दिनांक : 14 जानेवारी २०१७,
ठिकाण: पनवेल तालुक्यातील

मकरसंक्रांतिचे औचित्य साधुन बहाळ येथील मेडलाईफ फाऊंडेशन व सर्व सहकारी मित्र यांनी दि.14 जाने. 2017 रोजी पनवेल तालुक्यातील आदिवासी भागातील चाफेवाडी व फणसवाडी येथे जाऊन तेथील गरिब व आदिवासी पाड्यांवर राहणार्यांना तिळगुळ,फराळ व कपडे देऊन त्यांच्यासोबत मकरसंक्रांत साजरी केली. यावेळी मेडलाईफ फाऊंडेशन चे भुषण शिरुडे, मंत्रालयातील सहा.माहिती तंत्रज्ञान अधिकारी विनीत मालपुरे, सोऽहंम मेडिकल चे संचालक श्याम बहाळकर , मयूर डोंगरेकर,चेतन पाटिल, स्वप्निल राजपुत, अनिरुद्ध आस्तिकर, रोहित गट्टानी, गौरव जैन,प्रकाश जैन, उपस्थित होते.

Read more

Subscribe
Close
Good things come to those who
sign up for our newsletter
Join our email list to get the latest blog posts straight to your inbox
SUBSCRIBE
Give it a try, you can unsubscribe anytime.
close-link
error: